dcsimg

तरस ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
 src=
ब्लाकबक (काळवीट) राष्ट्रीय उद्यान मधील पट्टेरी तरस

तरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे. हा प्राणी आफ्रिकाआशिया खंडांमध्ये आढळतो. या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला 'लाफिंग ॲनिमल' (हसणारा प्राणी) असेही म्हणतात. तरस मांसभक्षक असतो. पट्टेरी तरस भारत, नेपाळ, पाकिस्तान तसेच मध्य पूर्वेतील देशउत्तर आफ्रिका, केनिया, टांझानिया, अरबी द्वीपकल्पात आढळतात. भारतात उत्तर भारत, मध्य प्रदेशात तरस सापडतात.

भारतात सध्या सुमारे १००० ते ३००० तरस आहेत. तरी तरसांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रजनन (Reproduction)- याच्या मिलन व विणीबद्दल फार कमी माहिती आहे. हिवाळा याचा मिलनऋतू असतो. पिलांचा जन्म उन्हाळ्यात होतो. तरसाला एका वेळेस तीन ते चार पिलं होतात. पिलांचे डोळे जन्मत: बंद असतात. पिलं लहान असतानादेखील त्यांच्या अंगावर आडवे पट्टे असतात. शरीरावर पांढरट मऊ केस असतात. परंतु मानेवर पूर्ण वाढलेल्या तरसासारखे आयाळीचे केस नसतात.

वैशिष्ट्ये-मजबूत जबडा, इतर शिकारी प्राण्यांनी केलेल्या शिकारीवर गुजराण करतो म्हणजे थोडक्यात गिधाड या पक्षासारखे सफाईचे काम करतो 

उपप्रजाती

license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

तरस: Brief Summary ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
 src= ब्लाकबक (काळवीट) राष्ट्रीय उद्यान मधील पट्टेरी तरस