dcsimg

पांढऱ्या छातीची पाणकोंबडी ( Marathi )

fornecido por wikipedia emerging languages
 src=
पांढऱ्या छातीची पाणकोंबडी

पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, टरकू किंवा कुंवा कोंबडी (इंग्लिश:Ceylonese Whitebreasted Waterhen; हिंदी:जलमुर्गी, डौक, दवक) हा एक पाणपक्षी आहे.

हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तिराएवढा असून याचा रंग दगडी पाटीसारखा करडा असतो, शेपटी भुंडी असते. हा लांब पायांचा जलचर पक्षी आहे. याची चेहरा व छाती पांढरी असते, शेपटीखाली गंजासारखा लालभडक डाग असतो. नर-मादी दिसायला सारखे असतात. ते एकटे किंवा जोडीने जमिनीवर आढळतात.

वितरण

ते भारतीय उपखंड, श्रीलंका आणि मालदीव बेटावर निवासी असतात. जून ते ऑक्टोबर हा त्यांच्या विणीचा हंगाम असतो.

निवासस्थाने

ते झिलाणी, भातशेती, खाजणी आणि झुडूपी दलदली अश्या भागात आढळतात.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली
licença
cc-by-sa-3.0
direitos autorais
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक
original
visite a fonte
site do parceiro
wikipedia emerging languages

पांढऱ्या छातीची पाणकोंबडी: Brief Summary ( Marathi )

fornecido por wikipedia emerging languages
 src= पांढऱ्या छातीची पाणकोंबडी